Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...

Continues below advertisement

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यलयाबाहेर भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक आमने-सामने आले होते.. यावरुन उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना आपलं सरकार आल्यानंतर सोडणार नाही असा इशारा ठाकरेंनी दिलाय. तर सरकार आलं तर पोलिसांना बघून घेऊ असं ठाकरे म्हणतात, पण त्यांचं सरकार येणारच नाहीये हे त्यांनाही माहीत आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय.. 

मुलुंडमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या पाच कार्यकर्त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय...
भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसेवाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता.. त्यानंतर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले.. धक्काबुक्कीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुलुंडमध्ये जात कोटेचा यांच्या कार्यालयाला भेट दिली.. भाजप नेत्यांनी संजय दिना पाटलांवर राडा घडवल्याचा आरोप केला..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram