Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरु,संपर्कप्रमुख अहवाल बनवणार

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरु,  विधानसभा मित्रपक्षांसोबत किंवा स्वतंत्र लढली तर काय होईल याचा मागितला अहवाल,  ठाकरे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख अहवाल बनवणार

कसा बनवणार विधानसभा संपर्कप्रमुख अहवाल?

१. लोकसभा निवडणूक २०२४ चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल

२. यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?

३. शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?

४. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?

५. सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?

६. संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?

७. फक्त शिवसेना लढली तर काय होईल?

८. मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?

९. बिएलए एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.

१०. लोकसभा निवडणूक २०२४ आपला अभिप्राय थोडक्यात ?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram