Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : दिल्लीत शेपट्या हलवता, हत्या झालेल्यांची तुलना श्वानांशी?
Uddhav Thackeray : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबार, हल्ला प्रकरणावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना आता शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हे राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.