Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाचा 1 जुलैला विराट मोर्चा
येत्या १ तारखेला ठाकरे गट मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. आदित्य़ ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. शिवसेना भवनमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. मुंबई महापालिकेला कुणी मायबाप उरलेला नाही, वाटेल तसा कारभार सुरू आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं.