Uddhav Thackeray Raj Thackeray : 'या' मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकमत, म्हणाले...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सख्खे चुलत बंधू राजकीयदृष्ट्या एकमेकांना दुरावले असले तरी मराठीच्या मुद्द्यावर ते दोघंही आज एकच बोली बोलताना पाहायला मिळाले. निमित्त होतं अर्थातच आजच्या मराठी भाषा गौरवदिनाचं. ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीनं मरिन लाईन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ठाण्याच्या गावदेवी मैदानात मराठी भाषा गौरवदिनानिमित्त खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यांमध्ये अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola