Uddhav Thackeray Raj Thackeray : 'या' मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकमत, म्हणाले...
abp majha web team
Updated at:
28 Feb 2024 12:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सख्खे चुलत बंधू राजकीयदृष्ट्या एकमेकांना दुरावले असले तरी मराठीच्या मुद्द्यावर ते दोघंही आज एकच बोली बोलताना पाहायला मिळाले. निमित्त होतं अर्थातच आजच्या मराठी भाषा गौरवदिनाचं. ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीनं मरिन लाईन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहात, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ठाण्याच्या गावदेवी मैदानात मराठी भाषा गौरवदिनानिमित्त खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यांमध्ये अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं.