Marmik Anniversary : प्रतिशिवसेना भवन उभारण्याच्या शिंदे गटाच्या निर्णयावर 'फटकारे'? ABP Majha

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकच्या माध्यमातून मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. कुंचल्याच्या फटकाऱ्यांमधून त्यांनी विरोधक आणि तत्कालीन सरकारला जेरीस आणलं... त्याच मार्मिकचा आज ६२वा वर्धापन दिन साजरा होतोय.. यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार आहेत... एकनाथ शिंदे आणि समर्थक शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर होणाऱ्या मार्मिकच्या वर्धापनदिनाला विशेष महत्त्व आहे.. त्यातच शिंदे गटाकडून मुंबईतील दादरमध्ये जिथं शिवसेनाभवन आहे तिथेच प्रतिशिवसेनाभवन उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय.. तसंच आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी आमिषाला बळी पडू नका आणि कामाला लागा असा सल्ला दिलाय. आज होणाऱ्या मार्मिकच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.. पालिका निवडणुकांसह सध्याची राजकीय परिस्थिती, ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया आणि भाजपबाबत काय बोलणार याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार आणि राजकारणाला कोणती दिशा देणार याकडे शिवसैनिकांसह महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola