Uddhav Thackeray PC Full : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Press Conference : विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी पत्रकार परिषदते बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. "महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व (Hindutva) सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola