Uddhav Thackeray On Devendra Fadanvis : आम्ही देशभक्त, मोदीभक्त नाही; फडणवीसांना ठाकरेंचं उत्तर
माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे देवेंद्र फडणवीस देशद्रोही आहेत का?
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या देशभक्त बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. आता त्याच्याबद्दल सुद्धा काही जणांच्या पोटात दुखल. काल फडणवीस म्हणाले, तिकडं गेलो तर हिंदू शब्द सोडला. मी हिंदू शब्द सोडलेला नाही. हिंदूत्व कधी सोडणार नाही. मी भाजपला लाथ घातली आहे. हिंदूत्व कसं सोडेन? पण माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे देवेंद्र फडणवीस देशद्रोही आहेत का? देशभक्त असणे हा देशात गुन्हा आहे का? आम्ही मोदभक्त नाही देशभक्त आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.