Uddhav Thackeray : आमचा पक्ष फुटला नाही तर दिवसेंदिवस वाढतोय : उद्धव ठाकरे Mumbai
संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अनिल राठोड यांनी हा प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधले. संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड हे आज मातोश्री निवासस्थानी आले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते अनंत गिते आणि खासदार अरविंद सावंत हे सुद्धा उपस्थित होते.