Uddhav Thackeray Mumba Devi Darshan : प्रचार संपला, उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Mumba Devi Darshan : प्रचार संपला, उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातला प्रचार अखेर संपलाय...
अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या तोफा आपापल्या उमेदवारांसाठी धडाडल्या...
सोमवारी महाराष्ट्रातल्या १३ जागांवर मतदान होणार आहे...
दक्षिण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात चुरस आहे..
दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई यांची लढत आहे..
तिकडे उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार रस्सीखेच आहे..
ईशान्य मुंबईत भाजपचे मिहीर कोटेचा यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील रिंगणात आहेत..
उत्तर मुंबईत भाजपकडून पियूष गोयल यांना तिकीट देण्यात आलंय.. गोयल यांच्याविरोधात काँग्रेसनं भूषण पाटील यांना रिंगणात उतरवलंय..
उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या उज्ज्वल निकम यांच्याविरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचं आव्हान असणार आहे