Uddhav Thackeray in Meeting :नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्याने प्रचंड असंतोष,मात्र संयम ठेवा :उद्धव ठाकरे

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. मात्र त्यांना आणि कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत नेत्यांना दिलेत. बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधवांनी ही माहिती दिलीय. निवडणूक आयोगाच्यावर जनतारुपी न्यायालय आहे आणि त्यात आपल्याला नक्की न्याय मिळेल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याचं भास्कर जाधव म्हणाले. दरम्यान देशातल्या स्वायत्त संस्था कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केलीय..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola