Uddhav Thackeray Full PC:Rahul Gandhi यांच्याशी सहमत नाही,सावरकरांवरुन टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर

Continues below advertisement

Uddhav Thackeray PC : "काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे," असा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसंच "शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शिवसेनाप्रमुख म्हटलं तर संघर्ष आला. अन्यायाविरुद्धचा लढा आलाच. एका अर्थाने मला आजचा हा स्मृतिदिन मला काहीसा वेगळा आहे. कारण काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे. अनेक शिवसेनाप्रमुख आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यात काही हरकत नाही. मात्र ते करताना त्याचा कुठे बाजार होऊ नये अशी माझी नम्र भावना आहे. बाजारुपणा दिसता कामा नाही. विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कृतीतून विचार व्यक्त करता येतो. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही, तर केवळ बाजारुपणा आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram