Uddhav Thackeray Meeting : ठाकरे गटाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढील आठवड्यात राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी बैठकांचं आयोजन केलंय. ३१ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत मातोश्रीवर या बैठका पार पडणार आहेत. बैठकांसाठी आजी-माजी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलंय..