Udayan Raje on Sanjay Rathod | चूक असेल तर शिक्षा व्हायला हवी : खासदार उदयनराजे

Continues below advertisement
टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत प्रतिक्रिया देताना खासदार छत्रपती उदयनराजे म्हणाले की, आधी राजेशाही होती. परंतु आता राजेशाही जाऊन देशात लोकशाही आली आहे. लोकशाहीत आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असतो. आपल्या मतांवर आमदार, खासदार निवडून येत असतात. त्यामुळे अशा नेत्यांनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला आणि बोलायला हवं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात जर संबंधित व्यक्ती जबाबदार असेल तर तत्काळ त्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी. त्याठिकाणी उदयनराजे असतील तरी कारवाई ही व्हायलाच हवी. कायद्यासमोर सर्वजण समान असतात.

आज छत्रपती उदयनराजे भोसले मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घ्यायला आले होते. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंच्या भेटीचं कारण उदयनराजे यांना विचारलं असता. भेटी बाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, "आमच्या घरात लवकरच एक लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास 1 तास राज ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. भविष्यात देशाची वाटचाल कशी असावी, देशाच्या प्रगतीत आवश्यक बाबी कोणत्या असाव्यात याबाबत चर्चा झाली. पक्षीय लेव्हलची आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या पत्रिका देण्याच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी मी घेत आहे."
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram