BMC Audit : मुंबई महानगरपालिकेचे मागील 25 वर्षाचं ऑडिट होणार, 3 सदस्यांची समिती गठीत : Uday Samant

Continues below advertisement

मुंबई महापालिकेतील गेल्या २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार ------------------ तीन सदस्यीय समिती गठित करणार, मंत्री उदय सामंतांची घोषणा

मुंबई:   मुंबई महानगरपालिकेची (BMC)  मागील 25  वर्षाच ऑडिट केलं जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या  मागील 25 वर्षातील अर्थिक व्यवहारांचा ऑडिट होणार आहे.  यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे.  नियोजन, नगरविकास विभाग यांचे सचिव समितीमध्ये सहभागी असणार आहे. भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना मागणी केली होती. पुढील अधिवेशनात या संदर्भातील अहवाल सादर केला जाणार आहे

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर शिवसेनेची 25 वर्ष सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचा ऑडिट करण्याची मागणी होत आहे. मागील 25 वर्षात  मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून कायम करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेत 8 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 दरम्यानच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी कॅगकडून करण्यात आली होती. या सगळ्या अहवालामध्ये पारदर्शकतेचा अभाव, निधीचा निष्काळजीपणे वापर आणि ढिसाळ नियोजन असे ताशेरे कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेच्या एकूण कारभारावर मारले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी  हा फक्त ट्रेलर असल्याचं  सांगून खरा पिक्चर बाकी असल्याचं म्हटलं  होते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram