Actor Sameer Sharma suicide | टीव्ही अभिनेता समीर शर्माची आत्महत्या

छोट्या पडद्यावरील अभिनेता समीर शर्मा मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. 44 वर्षीय समीर शर्माने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.


समीर सर्माने ज्योती, कहानी घर घर की, लेफ्ट राईट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दूं - एक बार फिर, ये रिश्ते है प्यार के या मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक मालिकांत त्याने भाऊ, वडील, नायिकेचा भाऊ अशा व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. मालाडमधील राहत्या घरी किचनमध्ये त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola