Tushar Gandhi : कट्टरवादी हिंदुत्वामार्फत लोकांमध्ये भेदभाव, तुषार गांधींची भाजपवर टीका
सिव्हिल सोसायटीच्या मार्फत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देखील महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय. अनेक ठिकाणी तुषार गांधी महाराष्ट्रात महाविकास आघाडीसाठी प्रचार करताना दिसत आहेत. मुंबईत देखील सिव्हिल सोसायटीकडून प्रचार केला जात आहे. हिंदुत्वाबरोबर काही कंटेन्शन नाहीत. एकीकडे हिंदुत्व उदारमतवादी होऊ बघतंय आणि दुसरीकडे कट्टरवादी हिंदुत्वाचा प्रयोग केला जातोय. याच कट्टरवादी हिंदुत्वामार्फत लोकांमध्ये भेदभाव होत असल्याचं म्हणत तुषार गांधी यांनी भाजपवर टिका केलीय.
सोबतच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील निशाणा साधला. आंबेडकर यांना इंडिया आघाडीचा पर्याय दिला होता. व्यवहारी गोष्टी त्यांनी केल्या असत्या तर आज ते सोबत असते. त्यांना शिवाजी पार्कमधील सभेत मानसन्मान देखील दिला गेला जो सर्वांनी पाहिला आहे… मात्र, त्यांना एक जबाबदारी दिली गेली होती, आणि त्यांनी ती निभावली अशी घणाघाती टिका गांधींनी आंबेडकरांवर केलीय. त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या गेल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या न स्विकारता वोट कापण्याचा पर्याय निवडल्याचं म्हणत आंबेडकरांवर आसूड ओढलेत. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलीय…