Zeeshan Khan शी मैत्री झाल्यानंतर तुनिषा हिजाब घालत होती, Tunisha Sharmaच्या मामाचे धक्कादायक खुलासे
Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषा 'अलिबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता शिझान खानवर (Zeeshan Khan) लावण्यात आला होता. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी तुनिषाच्या कुटुंबियांचा जबाब पोलीस नोंदवत आहेत. पोलिसांनी तुनिषा शर्माच्या मामाचा जबाब नोंदवला आहे. तुनिषाचा मामा पवन शर्मानं नुकतीत एबीपी न्यूजला मुलाखत दिली. 'आत्महत्या करुच शकत नाही', असं या मुलाखतीमध्ये त्यांनं सांगितलं.