Truck Driver Strike : पेट्रोल-डिझेल टँकरच्या संपाचा बेस्टवर परिणाम नाही, बेस्ट प्रशासनाची माहिती

Truck Driver Strike Petrol Shortage : मुंबई : हिट अँड रन कायद्याविरोधात (New Hit and Run Law) ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप (Transport Union Strike) पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस (Second Day Of Strike) आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola