Truck Driver Strike Called Off : Mumbai त पहाटेपासूनच Petrol पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी
केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. हिट अँड रन प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तूर्तास लागू होणार नाहीत, असं आश्वासन केंद्रीय गृह खात्याकडून देण्यात आलं आहे. त्यामुळं ट्रक मालकांच्या संघटनेकडून ट्रक आणि टँकरचालकांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता ट्रक आणि तुमच्या गाड्या चालवा, असं आवाहन मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे.