IND vs PAK : मोक्या क्षणी सोडला झेल, ट्रोलर्सनं अर्शदीप सिंगचा थेट ‘खलिस्तानी’ संघटनेशी जोडला संबंध
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडून झालेल्या केवळ एका चुकीमुळं त्याला सध्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न काही देशद्रोह्यांकडून सुरु आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघांमधला सुपर फोर सामना निर्णायक वळणावर असताना अर्शदीप सिंगच्या हातून असिफ अलीचा झेल सुटला. अर्शदीपनं दिलेल्या या जीवदानानं सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. कारण असिफ अलीनं आठ चेंडूंत 16 धावा ठोकून पाकिस्तानला विजयपथावर नेलं. आणि याच कारणासाठी अर्शदीपला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येक आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे, अर्शदीपच्या विकिपीडियावरील पानावर काही बदल करण्यात आले आहेत. संबंधित पानावर अर्शदीपचा संबंध थेट ‘खलिस्तानी’ संघटनेशी जोडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न देशविघातक शक्तींनी सुरु केला आहे.