Aadivasi Koli Protest Mumbai : आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी समाजाचा मोर्चा
आदिवासी कोळी समाजाचा पायी मोर्चा पोलिसांनी मुंबईच्या सीमेवर अडवून ठेवला आहे. टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी या समाजातील बांधव आरक्षणासाठी आणि विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले असून धुळे ते मंत्रालय अशी संघर्ष पदयात्रा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. शिष्टमंडळाने कालच सरकारमधील गिरीश महाजन यांची भेट घेतली. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आदिवासी कोळी समाजाला वेळ देण्यात आलीय. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ठिय्या मांडून आंदोलन करु, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
Tags :
Ministry Foot March Police Chief Minister Eknath Shinde MUMBAI Tribals Koli Samaj Brother Reservation