Vikram Kirloskar Death : प्रसिद्ध उद्योगपती विक्रम किर्लोस्करांचं हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू

Continues below advertisement

Vikram Kirloskar Death : प्रसिद्ध उद्योगपती विक्रम किर्लोस्करांचं हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू

मोटार वाहन उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्ंय ते 64 वर्षांचे होते..आज दुपारी १ वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं.. विक्रम किर्लोस्कर हे MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्षही होते. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram