Thane Vaccine : लस घेतली नाही तर टीएमटीचा प्रवास करता येणार नाही; ठाणे महापालिकेचा निर्णय
Continues below advertisement
कोरोना लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ठाणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, त्या नागरिकांना ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी आज या निर्णयाची माहिती दिली. पुढील आठवड्यात मंगळवारपासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात टीएमटी ने प्रवास करायचा असेल तर लस घेणे यापुढे बंधनकारक असणार आहे.
Continues below advertisement