Tipu Sultan Controversy : मालाडमधल्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन हिंदुत्ववादी संघटनांचा राडा

बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी टिपू सुलतानवरुन मुंबईत झालेल्या राड्याची...
मालाडमधल्या एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आल्यानं मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय..
काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी मालाडमधल्या मैदानाला टिपू सुलतान याचं नाव देत लोकार्पण केलं..
पण त्याआधी भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं जोरदार राडा केला..
मंत्री अस्लम शेख आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली..
यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली..काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचाही वापर केला..अनेक कार्यकर्त्यांना काही काळासाठी ताब्यात घेण्यात आलं होतं..
क्रीडा संकुलाला टिपू सुलतान हे नाव दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांसह नेतेही आक्रमक झाले होते..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola