Mumbai Police : मित्राला धडा शिकवण्यासाठी धमकीचा फोन, पोलिसांची नुसतीच पळापळ
Mumbai Police : ३० डिसेंबर २०२२ रोजीची रात्र मुंबई पोलिसांसाठी मोठी डोकेदुखीची ठरली. दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मुंबई पोलिसांची नुसतीच धावपळ उडाली. एक संशयित बोट आढळल्याची माहिती तटरक्षक दलाच्या मुख्यालयामधून मिळाली आणि पोलिसांची धावपळ सुरु झाली. रात्रभर तपास केल्यानंतर समजलं की ती बोट मच्छीमाराची होती. त्यानंतर दुसऱ्या घटनेत एकाने पोलीस कंट्रोल रुमला फोन करत ३१ डिसेंबरला बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन केला. या फोनमुळे पुन्हा पोलीस सतर्क झाले आणि पोलिसांनी तपास सुरु केला. तपासाअंती दारुच्या नशेत एकाने मित्राला धडा शिकवण्यासाठी फोन केल्याचं उघडकीस आलं आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.