Boriwali Cha Raja: बोरिवलीच्या राजाचं यंदाचं ५४ वं वर्ष, देखावा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

Continues below advertisement

सध्या आपण आहोत बोरीवलीमध्ये. बोरिवलीच्या राजाचं यंदाचं  ५४ वं वर्ष आहे . दरवर्षीच हे मंडळ गणेशोत्सव अतिशय जल्लोषात साजरा करीत असतं. मंडपाची रचना विशिष्ट पदधातीने आहे आणि महानगरपालिकेच्‍या सर्व नियमाचे पालन करून करण्‍यात आली आहे जेणेकरुन वाहतुकीस अडखळा निर्माण होवू नये.  गाड्या रुग्णवाहिका जाऊ शकतील याची दक्षता घेण्यात आली आहे. लालबागचे  मूर्तिकार निखिल राजन खातु यांनी घडविलेली ही सुबक गणेशमूर्ती आहे. भव्य महालाची आरास आणि हिंदुत्वावर आधारित शिवकालीन किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार ही खास वैशिष्ट्ये आहेत. वृध्दाश्रमासाठी व अंधांसाठी मदतीचा हात पुढे करुन शिव मित्र मंडळाने आपली सामाजिक उपक्रमांची परंपराही कायम राखली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram