New Year Celebration : नव्या वर्षात वाहतूककोंडी ,प्रदुषणापासून सुटका होणार, अनेक विकासकामांना गती
नव्या वर्षात वाहतूककोंडी ,प्रदुषणापासून थोडी का होईना सुटका होण्याची चिन्हं आहेत. कारण वर्षभरात मुंबई ,ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार आणि आदी महानगरांमध्ये विविध प्रकल्पांना गती मिळणार आहे. तर पश्चिम-मध्य-हार्बर-ट्रान्सहार्बर सेवांसाठी विविध योजना मार्गी लागतायत. एमएमआरडीए, मध्य रेल्वे, ठाणे महापालिका आणि सिडको यांसारख्या आदी विविध संस्थांमार्फत ठिकठिकाणी विकासप्रकल्प राबविले जाणारेत.