Bhiwandi : भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर, मंदिराला शिवकालीन गडकिल्ल्यांचं स्वरुप
Continues below advertisement
भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्यदिव्य मंदिर राज्यातील पाहिलं मंदिर असणार आहे. या मंदिराचे बांधकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे. इतिहासातील पाऊलखुणा जपण्यासाठी महाराजांचे मंदिर उभारण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण असून त्याची उंची 55 फूट आहे. शिवकालीन गडकिल्ल्यांचे स्वरूप या मंदिराला यावे यासाठी प्रवेश द्वार तयार केले जात असून त्याची उंची 36 फूट आहे.
Continues below advertisement