MNS : राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याला आता गुजराती समाजाने बॅनरबाजी

Continues below advertisement

MNS : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याला आता गुजराती समाजाने बॅनरबाजी करत जाहीर समर्थन दर्शवलंय.. घाटकोपरमधील आसल्फा भागात राज ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलीय.. विशेष म्हणजे या बॅनरमध्ये राज ठाकरेंचा हिंदू हृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आलाय..  गुढीपाडवा मेळाव्यातील मशिदीवरील भोंग्यांना हनुमान चालीसाने उत्तर देण्याच्या आवाहनाला घाटकोपरमधील मनसैनिकांनी प्रतिसाद दिला होता. दुसऱ्याच दिवशी मनसेच्या घाटकोपर येथील कार्यालयवर भोंगे लावून मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावली होती. आता पुन्हा बॅनरबाजी करत राज ठाकरेंना समर्थन दर्शवण्यात आलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram