Maharashtra Budget 2020 | महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक : अशोक चव्हाण
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर केला. यावेळी शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षा, बेरोजगारासाठी सरकारनं कोट्यवधींचा निधी जाहीर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.