Thane Shahapur Cycle Distribution : जिल्हा परिषदेचा खास उपक्रम, शाळेत जाण्यासाठी मुलींना सायकल वाटप
Thane : शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आजही आर्थिक परिस्थिती व वाहतुकीच्या साधनांची कमतरता यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत यायला व जायला मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे येथील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून देखील वंचित राहत होते. मुलांच्या तुलनेने मुलींना शाळेत यायला अनेक अडचणी येत असल्याने विद्यार्थिनींची हि अडचण ठाणे जिल्हा परिषदेने आता दूर केली आहे.
शहापूर येथील तब्बल बाराशे विद्यार्थिनींना महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात आल्या असून पहिल्या टप्प्यात पाचशे सायकलींचे वाटप जिपच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती व विद्यमान सदस्या रत्नप्रभा भगवान तारमाले यांच्या प्रयत्नाने वाटप करण्या आल्या. यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जिप अध्यक्षा पुष्पाताई बोराडे पाटील ,जिप उपाध्यक्ष सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.