ABP News

ठाण्यात 16 पक्षी मृतावस्थेत आढळले; पाणबगळे, पोपटांचा मृत्यू नेमका कशामुळे?

Continues below advertisement
 एकीकडे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू मुळपदावर येत असतांनाच ठाण्यात तब्बल सोळा पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूच्या शंकेने  हाहाकार उडाला आहे. घटना आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलातील, जिथे आज मॉर्निंग वॉक साठी आलेल्या काही नागरिकांना एकामागोमाग एक असे पोंड हेरॉन म्हणजेच पाण बगळे मेलेले आढळून आले. सोबत 2 पोपट देखील याच परिसरात आढळून आले आहेत. एकाच वेळी एवढे पक्षी मेल्याने घटनास्थळी पोहोचलेले ठाणे महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram