Thane : लसीकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने

ठाण्यात आधी रस्त्यांवरच्या खड्ड्यांच्या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. आता लसीकरणाच्या मुद्यावरून या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. कळव्यातील लसीकरण केंद्राबाहेर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं बॅनर फाडल्यामुळं हा वाद निर्माण झाला. ठाण्याचे महापौर आणि सत्ताधारी शिवसेनेकडून लस वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ठाणे पोलिसांकडे लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुंडांना अटक करा नाहीतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उग्र भूमिका घेतल्यास जबाबदारी घेणार नसल्याची धमकी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola