Thane Traffic : ठाण्यात अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 15 मिनिटांच्या प्रवासासाठी दोन तास खोळंबा
ठाणेकरांना आज कधी नव्हे अशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. ठाण्यात पावसाच्या माऱ्यामुळे डांबर उखडून पडल्याने सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे. अशातच आज दुपारपासूनच सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती. कोपरी पूल ते साकेत पूल संपूर्ण जाम होता, तिकडे घोडबंदर रोडवरील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे त्यामुळे संपूर्ण घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. भिवंडी बायपास आणि मुंब्रा बायपासवर देखील खड्डे बघायला मिळत आहेत. यासंदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…