Thane | शहापूरमधील तीन तरुणांचे मृतदेह लटकलेल्या झाडावर चौथा फास; गूढ वाढलं
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चांदे या गावाच्या हद्दीतील एका झाडावर तीन तरुणांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये एका गुराख्याने पाहिले होते. ही आत्महत्या आहे की यांचे खून करून यांना या झाडाला लटकवलं आहे. यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. त्यानंतर खर्डी पोलिसांनी तिनही मृतदेह झाडावरून खाली उतरवल्यानंतर त्याच झाडावर एका गुलाबी साडीने चौथा फास तयार असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यामुळे पोलिस आणि स्थानिक नागरिक चक्रावून गेले आहेत. या तिनही मृतदेहांसोबत आणखी चौथा फास कोणत्या व्यक्तिसाठी होता आणि हा फास कोणी तयार केलाय? असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. या संपूर्ण प्रकरणा संदर्भात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.