Thane Schools Reopen : मुंबईनंतर ठाण्यातल्या शाळाही 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार ABP Majha

Continues below advertisement

राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतही आता शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी शाळेतील प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. या पूर्वतयारीमध्ये शाळा पूर्णतः सॅनिटाईज करणे, शाळेतील बाक आणि वर्गांची साफसफाई करणे, प्रयोगशाळांमध्ये साफसफाई करणे, अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच शाळा प्रशासनाने पालकांशी सल्लामसलत करून नवीन नवीन उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. दादर मधील साने गुरुजी विद्यालयात देखील अशीच लगबग आम्हाला बघायला मिळाली. या शाळेने सर्व पालकांशी संपर्क साधून ते मुलांना शाळेत पाठवणार आहेत की नाही यासंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. सोबतच मानसोपचार तज्ञशी बोलून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी जास्तीत जास्त वेळ द्यावा असे सांगण्यात आले आहे. 

तर मुंबईप्रमाणेच ठाणे शहरात देखील शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन कामाला लागले आहे. अनेक शाळांमध्ये साफसफाई सोबत शाळेत जंतूनाशक फवारणीचे काम जोरात सुरू आहे. ठाण्यातील राबोडी इथल्या सरस्वती विद्यालयात खास करून एक मेडिकल रूम सज्ज ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शाळेत एक डॉक्टर आणि परिचारिका असणे बंधनकारक आहे. त्यानुसार या मेडिकल रूममध्ये विद्यार्थी शाळेत असेपर्यंत एक परिचारिका आणि डॉक्टर असणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram