Thane Schools Reopen : मुंबईनंतर ठाण्यातल्या शाळा सुरु होणार; शाळा प्रशासनाकडून तयारी सुरु ABP Majha

 मुंबईप्रमाणेच ठाणे शहरात देखील शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन कामाला लागले आहे. अनेक शाळांमध्ये साफसफाई सोबत शाळेत जंतूनाशक फवारणीचे काम जोरात सुरू आहे. ठाण्यातील राबोडी इथल्या सरस्वती विद्यालयात खास करून एक मेडिकल रूम सज्ज ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शाळेत एक डॉक्टर आणि परिचारिका असणे बंधनकारक आहे. त्यानुसार या मेडिकल रूममध्ये विद्यार्थी शाळेत असेपर्यंत एक परिचारिका आणि डॉक्टर असणार आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शाळा करणार असल्याची माहिती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी एबीपी माझाला दिली. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola