Thane Rains : शिळफाट्यावर वाहनांचं नव्हे, लोकांचं ट्रॅफिक जॅम; थरारक रेस्क्यू ऑपरेशन कॅमेऱ्यात कैद
डोंबिवलीतील शीळफाटा येथेही काही नागरिकांचा अतिउत्साह पाहायला मिळाला. नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळं दुषणांचा धनी ठरणारा मार्ग म्हणजे, डोंबिवलीकडे जाणारा शिळफाटा. मात्र या शिळफाट्यावर काल वाहनांचं नव्हे तर जनतेचं ट्रॅफिक जाम पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळं शिळफाटा मार्गाची काय अवस्था झाली होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दरम्यान पावसाच्या प्रवाहातून वाचण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून जीव मुठीत धरुन वाट काढावी लागत होती. शिळफाटा परिसरातल्या जवळपास सगळ्याच दुकानात पाणी शिरलं होतं.