Thane: मुंबई, ठाण्यात प्रशासक नेमणार की मुदतवाढ? प्रभाग रचनेची प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण होणार ABP Majha

मुंबईसह महापालिकांच्या निवडणुका आता एप्रिल किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगानं प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्याला अंतिम रुप मार्चमध्ये दिलं जाणार आहे. त्यामुळे त्यानंतरच निवडणुकीची घोषणा होईल. त्यामुळे निवडणूक एप्रिल किंवा त्यानंतरच होण्याची शक्यता आहे. निवडणूक पुढे गेल्यास मुंबई-ठाण्यात प्रशासक नेमणार की नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार याची उत्सुकता आहे.  दरम्यान, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेची प्रतीक्षा मंगळवारी संपणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई महापालिकांची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola