महापौर म्हस्के, आमदार फाटक यांनी बेकायदेशीररित्या लस घेतल्याचा भाजप गटनेते मनोहर डुंबरेंचा आरोप

कोरोना आपत्तीच्या काळात झोकून देत कार्य न करता ठाणेकरांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोना लस घेतली. महापौर नरेश म्हस्के यांच्याबरोबर शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी घेतलेली कोरोना लस म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे. ठाण्याच्या इतिहासात नरेश म्हस्के यांच्यासारखा नियम डावलणारा महापौर झाला नाही, अन्, होणारही नाही, अशी टीका भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वाना समजण्याकरता लस घेतली असल्याचा महापौरांचा दावा आहे. मात्र, याबाबत सरकारी आदेश दाखविणार का, असा सवालही डुंबरे यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola