Thane : ध्वजारोहणात महिलेची अडवणूक; लोढा अमारा सोसायटीतील व्हिडीओ समोर
ठाण्यातील लोढा अमारा सोसायटीतील एका महिलेचा केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय,...आज प्रजासत्ताक दिनी एका महिलेनं सोसायटीतील लोकांना प्रजासत्ताक दिन साजरा करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला.. याशिवाय या महिलेनं सुरक्षा रक्षकांना मारहाण केली... हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली...
कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन राडा करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली आहे. या महिलेचे मानसिक संतुलन बिघडलेल्याची माहिती हाती येतेय.