Thane Lockdown | ठाण्यात लॉकडाऊनबाबत संभ्रमावस्था कायम, प्रशासनाकडून अधिकृत घोषणा नाही
ठाणे शहरातील लॉकडाऊनबाबत अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. दुपारी ठाणे पोलिसांनी लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार, असं ट्वीट केलं होतं. मात्र महापालिकेकडून अद्यापही त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. आज महापालिकेच्या बैठकीनंतरही याबाबत ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच ठाणे पोलिसांनी दुपारी केलेलं ट्वीट देखील हटवलं आहे. त्यामुळे नक्की लॉकडाऊन लागू होणार की नाही, असा प्रश्न ठाणेकरांन पडला आहे.