Thane : खारेगाव उड्डाणपूलावरून राजकारण तापलं, Jitendra Awhad - Eknath Shinde यांच्यात जुंपली

Continues below advertisement

ठाणे: राज्यात महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष सामिल असले तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरबुऱ्या काही संपायला तयार नाहीत. ठाण्यात गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले. या पुलाच्या श्रेयवादावरुन बोलताना तुम्ही हिशोब काढला म्हणून मी काढला असा टोला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला. 

राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा दावा आहे की त्यांच्या पाठपुराव्याने हा पूल पूर्ण झाला आहे. तर खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा आहे की त्यांच्या पाठपुराव्याने हा पूल पूर्ण झाला. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "या पुलाच्या निर्मितीसाठी आम्ही एकत्र काम केलं. निवडणूक अली की आव्हाड त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझं करतो. पण नंतर पुन्हा आम्ही एकत्र येतो, अगदी डावखरे असल्यापासून. जेव्हा माझ्याकडे कळवा मुंब्राचा प्रस्ताव आला त्यावेली तो मी अडवला नाही. आव्हाड साहेब तुम्ही आमचा मतदार संघ सांभाळा, आम्ही तुमचा सांभाळतो. जेव्हा ढोकलीच्या स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्यायचे होते तेव्हा एका क्षणाचाही विलंब आम्ही लावला नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाताखाली आपण काम करतोय. कितीतरी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले, जे गेले अनेक वर्षे प्रलंबित होते. त्यात आपण कधीही कोणताही राजकारण केलं नाही."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram