Jitendra Awhad vs Ganesh Naik | ...मग शरद पवारांचाही बाप काढणार का? : गणेश नाईक | ABP Majha
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात उफाळून आलेलं वाग्युद्ध संपण्याची चिन्हं नाहीत. किंबहुना एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपानं ते अधिकच चिघळत चाललं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर बाप बदलणारा नेता असा आरोप केला होता. त्यानंतर गणेश नाईक यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यावर गणेश नाईक 'दादां'च्या विधानावरुन एक लक्षात आले, की गणेश नाईक कृतघ्न आहेत. ज्या शरद पवार यांनी त्यांच्यावर उपकार केले. त्यांचेच नाव घेऊन त्यांनी आपल्या कृतघ्नतेवर शिक्कामोर्तब केलं, असा जोरदार टोला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.