Thane Unlock | 15 ऑगस्टपासून ठाण्यातील सर्व दुकाने खुली राहणार!
Continues below advertisement
मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातील सर्व दुकानं खुली होणार आहेत. 15 ऑगस्टपासून सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली ठेवण्यास ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोतर्ब करण्यात आलं.
ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते ते 15 ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. तसंच मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.
Continues below advertisement