Bullet Train | बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ठाणे महापालिकेत नामंजूर, महापौर नरेश म्हस्के यांच्याशी बातचीत
तब्बल चार वेळा ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आलेला बुलेट ट्रेन जागा हस्तांतरण प्रस्ताव अखेर बुधवारी (23 डिसेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत दफ्तरी दाखल करण्यात आला आहे. याचाच अर्थ तो नामंजूर करुन पुन्हा पाठवण्यात आला आहे. मुंबई कारशेडच्या जागेवरुन सध्या राज्य आणि केंद्रामध्ये राजकीय वातावरण तापत असताना ठाणे महापालिकेत सत्ताधारी असलेली शिवसेना आणि आता महाविकास आघाडीत घटक असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून या नामंजुरीचा प्रस्ताव आला पाठिंबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नगरसेवकांनी देखील यावेळी महासभेत मौनव्रत धारण केल्याने एक मताने हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.
Tags :
Thane Civic Body Land Acquisition Proposal Thane Municipal Corporation Mumbai-ahmedabad Bullet Train Bullet Train BJP Shiv Sena