TMC officer attack : ठाणे मनपाच्या महिला अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर राज्यातील महिला अधिकारी आक्रमक

Continues below advertisement

ठाण्यातल्या महिला नागरिक सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेतच. मात्र आता ठाणे महानगरपालिकेच्या महिला अधिकारी देखील असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. याचे कारण म्हणजे आजच ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. तर कल्पिता पिंगळे यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. हा भ्याड हल्ला एका अनधिकृत फेरीवाल्याने केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

ठाण्यातील कासारवडवली नाका याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडलाय. ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या आज संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram