Thackeray Group Podcast : ठाकरे गटाचा आवाज कुणाचा पॉडकास्ट, आज पहिल भाग येणार
ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार.. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे.. जनतेच्या मनातले प्रश्न त्यासोबतच महाराष्ट्राचे भविष्याचा विचार.. त्यासोबतच स्पष्ट आणि खणखणीत माहिती आता या "आवाज कुणाचा" शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळणार आहे.. आगामी निवडणुकांचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका लोकांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम हे सगळं या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे